महत्वाचे

“गाव हा विश्वाचा नकाशा “प्राचार्य डॉ नाथा मोकाटे

 

कन्हेरसर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातून प्राचार्य डॉ.नाथा मोकाटे यांचे प्रतिपादन 

संपादक /अग्रदूत –कन्हेरसर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्न श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव (आळंदी) अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिट्रसी ‘या उपक्रमा अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. 18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नाथा मोकाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे दाखला देत म्हणाले की,”गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा। गाव भंगता येईल अवदशा । देशामाजी ।।” म्हणून राष्ट्राचा उद्धार व्हावा असे वाटत तर आधी ग्रामोद्धार झाला पाहिजे.असे म्हणाले.

Oplus_131072

सदर शिबिराचे उदघाट्नास कनेरसर गावचे सरपंच सुनीता दत्तात्रय केदारी, बाळासाहेब करपुरे, राजेंद्र दौंड, नवनाथ गायकवाड, आदिती गायकवाड, विजय जगताप आदी कनेरसर, ग्रामस्थ,ज्ञान विलास कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. नितीन देवडराव, डॉ. विकास शेंडे व शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजीव कांबळे, प्रा. परमेश्वर भतासे प्रा. सविता मानके आदी उपस्थित होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. संजीव कांबळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगून या श्रम संस्कार शिबिरात ग्रामस्वच्छता आणि. अभियान व गाव ऐतिहासिक इतिहास संकलन इत्यादी उपक्रम घेण्यात येणार आहेत या संदर्भात सविस्तर विश्लेषण केले.

विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यासाठी कर्तव्यदक्षता पाळली पाहिजे -सरपंच सुनीता केदारी    श्रम संस्कार शिबिराचे उदघाटक सुनीता केदारी यांनी श्रमदानाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यासाठी कर्तव्यदक्षता पाळली पाहिजे तसेच राष्ट्राच्या विकासासाठी नेहमी सतर्क राहिले पाहिजे आणि प्रत्येकाने आपले व्यक्तिगत योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

Oplus_131072

या श्रम संस्कार शिबिराच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मा.श्री. विशाल तांबे, सचिव, मा.श्री. वैभव तांबे, खजिनदार, मा.श्री. मयूर ढमाले, प्रशासकीय संचालक, प्रा. डॉ. राजीव पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. माणिक कसाब विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. प्रफुल्ल जाधव, बी. बी.ए.सी.ए. विभाग प्रमुख, प्रा. रोहित कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख, प्रा. महेश म्हसागर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भत्ताशे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदान आणि झाली.

मुख्य संपादक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button